Home अकोले Kalsubai Peak: कळसुबाई शिखरावर रोप वे

Kalsubai Peak: कळसुबाई शिखरावर रोप वे

Roap way on Kalsubai peak

अकोले | Roap way on Kalsubai peak: नगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारे सह्याद्री पर्वत रांगेतील १ हजार ६४६ मिटर उंचीचे कळसूबाई शिखर हे राज्यातील सर्वोच्च शिखर होय. राज्यातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळख असणाऱ्या कळसुबाई शिखरावर पर्यटकांना जाण्यासाठी आता लवकरच रोप वे ची सुविधा उपलब्ध होणार असून त्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याचे आदेश राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

कळसुबाई (Kalsubai peak) येथे रोप वे ची सुविधा निर्माण करण्याबाबत राज्यमंत्री आदित्य तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन सहसंचालक, उपसचिव यावेळी उपस्थित होते. भंडारदरा येथे येणाऱ्या पर्यटकांना कळसुबाई शिखरावर जाता यावे यासाठी रोप वे बनविण्यासंबंधिताचा प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्याबाबतच्या सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या आहेत. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या व रोप वे मुळे वाढू शकणाऱ्या संभाव्य पर्यटक संखेबाबत सविस्तर माहितीसह अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देशही तटकरे यांनी दिले आहेत.

शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे. अनेक भाविकांची ही देवी कुलदैवत आहे. नवरात्रात नऊ दिवस मोठय़ा संख्येने भाविक शिखराला भेट देत असतात. कळसूबाई नजीकच  भंडारदरा धरण असून हजारो पर्यटक तेथे येतात. पर्यटकांचे आकर्षण असणारी साम्रद येथील सांदण दरी, घाटघर, रतनगडसारखी पर्यटन ठिकाणे याच परिसरात आहेत.

आदिवासी भागात पर्यटन विकासाबरोबरच आदिवासी बांधवाना रोजगार निर्माण होण्याचे साधन रोप वे च्या माध्यमातून तयार होईल. तसेच या रोप वे मुळे राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढेल असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी या बैठकीत सांगितले.

Web Title: Roap way on Kalsubai peak

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here