खुनाचा बदला: आरोपीच्या भावावर गोळीबार अन् कोयत्याने वार
Pune Murder Case: खून करणाऱ्या आरोपीच्या भावावर गोळीबार करून त्याच्यावर कोयत्याने वार.
पुणे: पुण्यातील नाना पेठेत काही दिवसांपूर्वी अक्षय वल्हाळ या तरुणाची कोयत्याने आणि दगडविटाणे मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यातील बुधवार पेठेत मंगळवारी थरारक घटना घडली. अक्षयचा खून करणाऱ्या आरोपीच्या भावावर गोळीबार करून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. बुधवार पेठेतील रामेश्वर चौकात हा सर्व थरार घडला. या घटनेत शेखर अशोक शिंदे (वय 32) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी रूपेश जाधव, गणेश इमुल, निरजन कटकम, कृष्णा बिटलिंग व कृष्णा गाजुल व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेखर शिंदे याने तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गंभीर रित्या जखमी असलेल्या शेखरच्या भावाने काही महिन्यांपूर्वी नाना पेठ येथे अक्षय वल्हाळ याचा खून केला होता. त्या खूनाचा बदला म्हणून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान, मंगळवारी रात्री शेखर रामेश्वर चौकातून दुचाकीवरून निघाला होता. यावेळी पाठिमागून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडविले. “तुझ्या भावाने आमचा मित्र अक्षय वल्हाळ याचा मर्डर केल्याचा बदला म्हणून आज तुझा मर्डर करणार आहे. जिवंत सोडणार नाही” असे म्हणून एकाने त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले व डोक्यात गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
दरम्यान भर वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत पडलेल्या शेखरला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिक तपास करत आहेत.
Web Title: Revenge of Akshay Valhal murder Accused brother was shit and stabbed with a knife
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App