Home क्राईम पुत्र प्रेमापोटी पित्याला बेड्या, प्रेमप्रकरणातून खून केल्याचे उघड

पुत्र प्रेमापोटी पित्याला बेड्या, प्रेमप्रकरणातून खून केल्याचे उघड

प्रेमप्रकरणात अडथळा ठरू नये या कारणातून ही हत्या (Murder) करण्यात आल्याची माहिती.

revealed that the son Murder the father because of love, love affair

नाशिक: जेलरोड पंचकगाव परिसरातील मलनिसारण केंद्राजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या त्या व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पितापुत्रास अटक करण्यात आली असून, प्रेमप्रकरणात अडथळा ठरू नये या कारणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती परिमंडळ २ च्या उपआयुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंचक गाव मलनिस्सारण केंद्राजवळ सोमवारी (दि.११) एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना झाडाझुडपात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. याबाबत नाशिकरोड पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिस तपासात बेपत्ता ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (रा. पंचक) या तरूणाचा मृतदेह असल्याचे समोर आले होते. याबाबत पत्नीने तक्रार दाखल केली होती. उपआयुक्त राऊत व सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक देविदास वांजळे व गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुंतोडे तसेच गुन्हे शोध पथकाचे नंदकुमार भोळे, हवालदार असलाक शेख, संदीप पवार, सुभाष घेगडमल, कल्पेश जाधव, रोहित शिंदे, यशराज पोतन, अरुण गाडेकर, मनोहर कोळी, पानसरे, नागरे, गोकुळ कासार, विनोद भोर, निलेश वराडे, किरण आवटी आदींच्या पथकाने कसून तपास केला असता सदरचा खून हा पंचक गाव परिसरातच राहणारा कार्तिक सुनील कोटमे (१९) याने केल्याचे निष्पन्न झाले. कार्तिक कोटमे याच्या अनैतिक प्रेमसंबंधात ज्ञानेश्वर गायकवाड यांचा अडथळा येत होता. परिणामी, ज्ञानेश्वर गायकवाडचा काटा काढायचा म्हणून कोटमे हा त्याच्या काही मित्रांसह गायकवाड याला पंचकगाव परिसरात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ घेऊन गेला व त्या ठिकाणी ज्ञानेश्वर गायकवाड याचा धारदार हत्याराने खून केला. त्यानंतर कार्तिक कोटमे हा त्या ठिकाणाहून पळून आला व दुसऱ्या दिवशी त्याने आपले वडील सुनील कोटमे यांना घडलेली हकीगत कथन केली.

या दोघांनाही न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून त्यांच्या ताब्यातून अॅटोरिक्षा, दुचाकी व एक मोबाईल असा सुमारे एक लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पुत्र प्रेमापोटी पित्याला बेड्या

 पुत्र प्रेमापोटी सुनील कोटमे व पुत्र कार्तिक या दोघांनी पुन्हा मलनिस्सारण केंद्राजवळ जाऊन सदरचा मृतदेह दिसू नये म्हणून झाडाझुडपात लपवला. तसेच मृतदेहावर सिमेंट कॉंक्रिट टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे गायकवाड यांची दुचाकीसुद्धा जवळच पाला पाचोळा घेऊन झाकून ठेवण्यात आली. याबाबत पितापुत्राने कबुली दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. केवळ पुत्र प्रेमापोटी सुनील कोटमे यांनी आपला मुलगा कार्तिक अडचणीत येऊ नये म्हणून त्याला मदत केली परंतु आता दोघांनाही पोलिसांच्या कोठडीत जावे लागले.

Web Title: revealed that the son Murder the father because of love, love affair

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here