Home अकोले अकोले: सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडले, दागिने लांबवले

अकोले: सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडले, दागिने लांबवले

Breaking News | Akole: निवृत्त शिक्षकाच्या बंद घरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचा प्रकार.

Retired teacher's house broken into, jewelery stolen

अकोले: तालुक्यातील भंडारदरा धरणाजवळील रणंद येथील लहू मंगळा पटेकर या निवृत्त शिक्षकाच्या बंद घरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्रीनंतर घडला. या घरफोडीत २३ हजारांच्या दागिन्यांची चोरी झाली. अकोले येथून भंडारदरा धरण क्षेत्राकडे जाताना रणंद बुद्रुक शिवारात रंधा धबधबा परिसरात ही घटना घडली. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला असून चोरट्यांचा शोधघेत आहेत.

शुक्रवारी रात्री राजूर गावातील सर्वोदय कॉलनीत चोरट्यांनी चार ठिकाणांहून घरफोडी केल्याची घटना ताजी असताना पुन्हा शनिवारी पुन्हा तशीच घटना घडली. शनिवारी लहू पटेकर नाशिक येथे आपल्या मुलांना भेटण्यास गेले होते. सोमवारी ते नाशिकहून पुन्हा रणंद गावी परतल्यावर त्यांना आपल्या कुलूपबंद घराची कुलपे तोडलेले दिसले. शनिवारी चोरट्यांनी रणंद बुद्रुक (रंधा धबधबा) येथील सेवानिवृत्त शिक्षक लहू मंगळा पटेकर यांचे बंद घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी घरामधील

 सर्व सामानाची उचकापाचक केली. घरातील भुईमुगाच्या शेंगाचे पोतेही जमिनीवर ओतले. कपाटातील सोन्याची नथ, चांदीचे बाजूबंद, कानातले वेल, टॉप्स व सोन्याचे मनी, असे एकूण २३ हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत लहू मंगळा पटेकर यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजूर पाठोपाठ भंडारदरा धरणाच्या आदिवासी रंघा फॉल भागातही चोरीचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरणात आहे. यापूर्वी मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी भंडारदरा गावच्या परिसरातील बंद घरे शोधून चोरीसाठी कुलपे तोडण्याचा प्रयत्ना केला. तेव्हा ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाल्याचे निदर्शनास आले. चास चोरट्यांनी काळे रेनकोट परिधाना केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. वेळीच पोलिसांकडून शोधा मोहीम राबवून त्यांना जेरबंद केले असते तर कदाचित पुढील प्रकार वाचला असता. अधिक तपास राजूट पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडूरंग कावळे, दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, सचिन शिंदे करीत आहेत.

Web Title: Retired teacher’s house broken into, jewelery stolen

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here