Home अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील सेवानिवृत्त जवान अपघातात जागीच ठार

संगमनेर तालुक्यातील सेवानिवृत्त जवान अपघातात जागीच ठार

Breaking News | Ahilyanagar Accident: दुहेरी ट्रेलरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना.

etired jawan died on the spot in the accident

राहुरी:  राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर हे दुहेरी ट्रेलरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि. 20 जानेवारी रोजी घडली.

आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर (वय 50) व त्यांचा मुलगा उत्कर्ष दोघेजण काल सकाळच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवर नगरकडे जात होते. ते राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनी समोर असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका डम्परने धडक दिली. त्याचवेळी एका दुहेरी ट्रेलरची धडक बसली. या अपघातात गोकुळदास दातीर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. मात्र यावेळी त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हा थोडक्यात बचावला असून तो किरकोळ जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार ठोंबरे व रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आलीया घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहे.

Web Title: retired jawan died on the spot in the accident

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here