संगमनेर: स्थानकात बस अंगावरून गेल्याने सेवानिवृत्त लेखापालचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना.
Breaking News | Sangamner: स्थानकात बस अंगावरून गेल्याने सेवानिवृत्त लेखापालचा मृत्यू.
संगमनेर संगमनेर आगारात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शनिवार दिनांक ०२ सकाळी ७:४५ वा. ही घटना घडली .
बस स्थानकात बसचे चाक अंगावरून गेल्याने डोक्याला, हाताला तसेच बरगड्यांना जबर मार लागल्याने सेवानिवृत्त लेखापालचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना संगमनेर शहरातील बस स्थानक परिसरात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने संगमनेर आगारा बद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या अपघातात संजय विनायक संभूस वय ७२ यांना कोल्हापूर कुरूंदवाड आगाराची बस क्र . एमेच ५१ सी ०३६३ चा धक्का लागल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच हात आणि बरगड्यावरून चाक गेल्याने बरगडी तुटल्या गेल्या. यामध्ये प्रचंड रक्तस्त्राव झाला. संजय संभूस यांना मेडिकवर रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
रविवार दिनांक ३ सकाळी ३ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तत्पूर्वी त्यांच्यावर सर्जरीही करण्यात आली होती. मेडिकवर चे डॉ. बोधे डॉ. हासे. त्यांच्या कडून चांगले सहकार्य मिळाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. घटना घटनेत बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज् बंद असल्याचेही आढळून आले. आगार प्रमुख प्रशांत गुंड यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी सुजल, मुलगी नीलांगी पूजारी बेंगलोर, मुलगा सौरभ संभूस हे टोकियो जपान येथे नोकरी करतात. त्यांच्या पश्चात नरेंद्र, अजीत, एक बहीण मंगल, एक नातू असा परिवार आहे सुरेश, प्रशांत आणि बहीण सुलोचना यांचे यापूर्वी निधन झाले. संजय हे खूपच सालस, शांत, आनंदी, परोपकारी, मृदुभाषी, हसरे, सुशील, कर्मयोगी आणि सर्वांचे भाऊ म्हणून परिचीत होते. संगमनेर कॉलेजमध्ये संजय यांनी अकाउंटंट म्हणून ३६ वर्ष सेवा केली. एक चांगला मित्र गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. आज जागतिक मित्र दिवस याच दिवशी एक चांगला मित्र सोडून गेल्याने मित्र परिवार आणि आप्तेष्टा मध्ये संजय भाऊ यांच्या जाण्याने संपूर्ण संगमनेर शहर हळहळ व्यक्त करीत आहे.
Breaking News: Retired accountant dies after being run over by bus at station