Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: जिल्ह्यातील 116 वर्षांचा इतिहास असलेल्या बँकेची मान्यता रद्द: आरबीआय

अहमदनगर ब्रेकिंग: जिल्ह्यातील 116 वर्षांचा इतिहास असलेल्या बँकेची मान्यता रद्द: आरबीआय

Ahmednagar News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची मान्यता रद्द केल्याने एकच खळबळ उडाली.

Reserve Bank of India cancels recognition of Nagar Urban Co-operative Bank

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यासह 116 वर्षांचा इतिहास असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बँकेची मान्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता बँकेला मेल करून माहिती देण्यात आली. बँकेवर प्रशासक नेमून पुढील कारवाई होणार आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाही त्यामुळे बँकेची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

रिझर्व्ह बँकेकडून अर्बन बँकेला गेल्या वर्षभरापासून निर्बंध लादण्यात येत होते. बँकेला या दरम्यानच्या काळात काही महिन्यांसाठी मुदतवाढही देण्यात आली होती. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेने नगर बँकेला नोटीस पाठवली होती. यामध्ये थकीत कर्ज वसुली, वाढलेला एनपीए, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन तसेच अनियमितता याबाबत खुलासा देण्याचे आदेश नोटीसमध्ये होते. तसेच आरबीआयने या बँकेची मान्यता का रद्द करु नये? असाही सवाल या नोटीसमध्ये करण्यात आला होता.

रिझर्व्ह बँकेने नगर बँकेला महाराष्ट्रात बँकिंगचा व्यवसाय करण्यास मनाई केली आहे ज्यामध्ये कलम 5 (ब) मध्ये परिभाषित केल्यानुसार ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे समाविष्ट आहे. लिक्विडेशन केल्यावर, प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींची 5,00,000/- (रुपये फक्त पाच लाख) च्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

Web Title: Reserve Bank of India cancels recognition of Nagar Urban Co-operative Bank

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here