अपहरण करून अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपीस अटक
Breaking News | Ahmednagar: वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून पळवून नेले. या तरुणावर अपहरण व बाल लैंगिक अत्याचाराचा वाढीव गुन्हा दाखल.
राहुरी: राहुरी तालुक्यातील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून पळवून नेले होते. राहुरी पोलिसांनी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला व आरोपीला जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथून ताब्यात घेतले. आरोपी गोकुळ ज्ञानदेव शिंदे (रा. सोनगाव, ता. राहुरी) या तरुणावर अपहरण व बाल लैंगिक अत्याचाराचा वाढीव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबबत माहिती अशी, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस गोकुळ ज्ञानदेव शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर आरोपी व मुलीबाबत काही माहिती उपलब्ध नसताना गुप्त बातमीदाराच्या मदतीने अथक परीश्रम घेवून गुन्ह्यातील अपहृत मुलीचा माग काढून तिचा शोध घेतला. ती जळगाव जिल्ह्यात एरंडोल येथे आरोपीसह मिळून आली. आरोपीच्या ताब्यातून पीडितेची सुटका करून तिला राहूरी पोलीस ठाण्यात आणले.
पीडित मुलीने तिच्या जबाबात आरोपी याने तिच्याशी बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध केल्याचे नमूद केल्याने सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (एम) सह लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम कलम ४,८,१२ प्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे. अधिक तपास स.पो.नि पवार करत आहेत. सदरची कारवाई पो.नि. संजय ठेंगे, स.पो.नि पवार, पो.हे.कॉ. सतीश आवारे, राहुल यादव, सुरज गायकवाड, सोमनाथ जायभाय, अशोक शिंदे, ढाकणे, सचिन ताजने, सतीश कुन्हाडे, रवी पवार, आजिनाथ पाखरे, शकुर सय्यद, पो.ना. सचिन धनद, संतोष दरेकर, रामेश्वर वेताळ यांच्या पथकाने केली आहे.
Web Title: Rescue of minor girl who was abducted and abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study