संगमनेर: १४ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका, एकावर गुन्हा
Breaking News | Sangamner Crime: कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या ७० हजार रुपयांच्या ७ गोवंश गायी व १४ हजाराचे ७ गोवंश वासरे अशा लहान मोठ्या १४ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका.
संगमनेर: कत्तलीच्या उद्देशाने शहरातील मदिना नगर येथील बंद घरामागील गोठ्यात चारा- पाण्यावाचून बांधून ठेवलेल्या लहान-मोठ्या तब्बल १४ गोवंश जनावरांची पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने कत्तलीतून मुक्तता केली.
संगमनेरात मतिनानगर भागात (राजीक मुनीर शहा) याने बंद घरामागे गोठ्यात कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंश जनावरे चारा- पाण्याविना निर्दयीपणे बांधल्याची माहिती खबऱ्याने वाकचौरे यांना दिली. पोउनि. निवांत जाधव, पोकाँ राहुल डोके, राहुल सारबंदे यांनी मदिनानगर येथे छापा टाकला. कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या ७० हजार रुपयांच्या ७ गोवंश गायी व १४ हजाराचे ७ गोवंश वासरे अशा लहान मोठ्या १४ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका केली.
जनावरे सायखिंडी शिवारात जीवदया पांजरपोळ येथे सोडली आहेत. पोकाँ सारबंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी राजीक मुनीर शहारा (रा. आपनानगर, कुरण रोड) याच्याविरोधात गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
Web Title: Rescue of 14 bovine animals from slaughter, crime against one
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study