गुंगीचं औषध देऊन शिक्षकाचा दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार
Nanded Crime News : दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर एका शिक्षकानेच वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली.
नांदेड: शिक्षकी पेक्षाला काळिमा फासणारी घटना नांदेड मध्ये घडली आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील तामसा येथे ही घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर एका शिक्षकानेच वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलींच्या कुटूंबियांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा पोलिसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षक गाडीत बसवून पिण्यास पाणी देत होता. त्या पाण्यात गुंगीचं औषध मिसळलं जायचं. पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत शिक्षक वारंवार मुलीला गाडीत बसवून घेऊन जात असे. त्यावेळी गुंगीचं औषध देऊन शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला. मुलीला शुद्ध आली तेव्हा तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
कुणाला सांगितलं तर तुझा बनवलेला व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी मुलीला शिक्षकाने दिली. त्यामुळे मुलीने घरी ही गोष्ट सांगण्याचं धाडस केलं नाही. यावेळी मुलगी गरोदर राहिली, तेव्हा तिचा गर्भपात देखील करण्यात आला. मुलीच्या घरच्यांना जेव्हा हा प्रकार समजला, तेव्हा मुलीला विश्वासात घेऊन कुटूंबियांनी विचारलं. तेव्हा पिडीत मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
दरम्यान, मुलीच्या कुटूंबियांनी तातडीने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली अन् तक्रार नोंदवली. मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना समोर येताच तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Repeated abuse of a teacher by giving drugs to a 10th class student