आता जिल्हानिहाय निर्बंध, कोरोना नियंत्रण भागात नियम शिथिल होण्याची शक्यता
मुंबई | Corona: राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत आहे तर काही जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन ब्रेक द चैन अंतर्गत निर्बंध हे जिल्हानिहाय निश्चित करण्याचा राज्यसरकार विचार करीत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जातील असे सूत्रांनी सांगितले आहे.
विविध संघटनांकडून तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून निर्बंध हटविण्याची मागणी होत आहे. बाजारपेठा खुल्या करण्यासाठी दबाव वाढत आहे. राज्याचे अर्थचक्र सुरु राहिले पाहिजे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता कामा नये. याचा निर्णय आता १ जूननंतरच घेतला जाईल.
राज्यातील १५ जिल्ह्यात अजूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. तेथे निर्बंध कायमच असण्याची शक्यता आहे. १५ जिल्हे रेड झोनमध्ये आहे.
या जिल्ह्यांत बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, गडचिरोली, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा, सोलापूरचा समावेश आहे.
Web Title: relax rules in the corona control area