Rekha Jare Murder Case: रेखा जरे हत्याकांड, बोठेचा जामीनासाठी अर्ज
अहमदनगर | Rekha Jare Murder Case: रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याने जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जिल्हा न्यायाधीश एम. व्ही कुरतडीकर यांच्यासमोर 29 जुलै रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे.
यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची पारनेर तालूक्यातील जातेगाव घाटात ३० नोव्हेंबर २०२० रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. बोठे हा तेव्हापासून फरार होता. त्यानंतर पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. सद्यस्थितीत तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता त्याने जामीन मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. बाळ बोठेने वकिलामार्फत 14 जुलै रोजी न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यावर आता 29 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
Web Title: Rekha Jare Murder Case bal bothe Bail Application