पोलीस पत्रकार बाळ बोठेला शोधायला गेले असता सापडला फरार डॉ. निलेश शेळके
Rekha Jare Murder Case | अहमदनगर: रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे हा अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्याचा शोध घेत असताना गेल्या अडीच वर्षापूर्वी फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके सापडला आहे. पुणे येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोटी रुपयांचे बोगस कर्जवाटप प्रकरणी शेळके याच्यावर २०१८ मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करीत आहे. तेव्हापासून हा फरार होता.
दरम्यान पोलीस २२ दिवसांपासून बोठे यांचा शोध घेत आहे. बोठे हा पुणे येथे शेळके याच्याकडे लपला असल्याचा संशय पोलिसांना आला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला. यावेळी शेळके हा सापडला मात्र बोठे याने पुन्हा पोलिसांना गुंगारा दिला आहे.
Web Title: Rekha Jare Murder Case Baal Bothe searching absconding Dr. Nilesh Shelke