सोशल मीडियावरील मैत्री, तरूणीवर वारंवार अत्याचार करून नकार व धमकी
Breaking News | Amravati Crime: सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना.
अमरावती : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा त्या तरूणीने त्याच्याकडे लग्नाची विचारणा केली तेव्हा मात्र त्याने लग्नास नकार दिला. ही घटना मंगळवारी (दि.18) दर्यापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
अनिकेत अंबादास चव्हाण (रा. दर्यापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अमरावती येथील एका महाविद्यालयात 19 वर्षीय तरुणी ही 2022 पासून शिक्षण घेत होती. त्याचवेळी अनिकेत हा सुद्धा अमरावतीमधील अन्य एका महाविद्यालयात शिकत होता. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर त्यांच्यात बोलचाल सुरू झाली.
काही दिवसांतच त्यांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर अनिकेतने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा आपल्या दर्यापूर येथील जुन्या घरी नेत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वारंवार झालेल्या याप्रकारानंतर पीडितेने अनिकेतकडे पुन्हा लग्नाची विचारणा केली. मात्र, अनिकेतने तिला स्पष्ट शब्दांत लग्नास नकार दिला.
इतकेच नाहीतर ‘तुझ्याकडून जे होते, ते करून घे’, असे म्हणत त्याने तिला शिवीगाळ केली व धमकी दिली. त्यामुळे प्रेमात विश्वासघात झालेल्या पीडित तरुणीने दर्यापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Rejection and threats by repeatedly abusing the young woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study