Home अहमदनगर अहमदनगर: विजेच्या धक्क्याने मृत्यू, दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर: विजेच्या धक्क्याने मृत्यू, दोघांवर गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar:  वीज वाहक पोलवर विजेच्या तारेची जोडणी करताना रोहित्र सुरू केल्याने शेतकरी यांचा मृत्यू.

Crime registered against two people who died due to electric shock

श्रीरामपूर : वाकडी (ता. राहाता) येथे वीज वाहक पोलवर विजेच्या तारेची जोडणी करताना रोहित्र सुरू केल्याने शेतकरी बाबासाहेब माधव लहारे (वय: ५१) यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी विकास लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक शेळके व अशोक कोते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अशोक शेळके या आरोपीस अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. विकास लहारे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की वडील बाबासाहेब लहारे यांना घरात विजेचे काम करण्यासाठी अशोक शेळके यांनी नेले. रोहित्राचा विद्युत प्रवाह वडिलांनी बंद करत गिरणी व्यावसायिक अशोक नारायण कोते यांना तशी माहिती दिली. काम करत असतानाच वडील बाबासाहेब लहारे विजेचा धक्का बसून कोसळल्याचे अशोक शेळके यांनी सांगितले. त्यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथे कामगार रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

वडिलांच्या सुरक्षेची काळजी न घेता विजेच्या खांबावर त्यांना चढविण्यात आले. अशोक कोते यांनी काम पूर्ण होण्यापूर्वीच रोहित्रावरील वीजपुरवठा सुरू केला. त्यामुळे शेळके व कोते दोघेही मृत्यूस कारणीभूत आहेत, असे म्हटले आहे.

Web Title: Crime registered against two people who died due to electric shock

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here