फोटो शूटला नकार, महिलेनी दिली बलात्काराची केस टाकण्याची धमकी
Breaking News | Pune Crime: आता लगेच फोटो शूट होणार नाही आपण नंतर करू असे म्हणताच महिलेने ४३ वर्षीय फोटोग्राफरला बलात्काराची केस करण्याची धमकी.
पुणे : आता लगेच फोटो शूट होणार नाही आपण नंतर करू असे म्हणताच महिलेने ४३ वर्षीय फोटोग्राफरला बलात्काराची केस करण्याची धमकी दिली. याप्रकरणी स्वप्नील वसंत रास्ते (४३, बिबवेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुराधा मुक्तेश्वर पाटील (रा. नन्हे, मुळ रा. सोलापूर) या महिलेविरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, , आरोपी अनुराधा ही ६ नोव्हेंबर रोजी स्वप्नील रास्ते यांच्या बिबवेवाडीतील फोटो स्टुडिओत गेली होती. तिला फोटो शूट करायचे होते. त्यावर रास्ते यांनी लगेच फोटो शूट होणार नाही, आपण नंतर करू असे सांगितले. यावर आरोपीने त्यांना तुझ्यावर बलात्काराची केस करेन अशी धमकी दिली. तसेच रास्ते यांच्याकडे पैशांची मागणी केली. फिर्यादींनी घाबरून तिला २० हजार रोख दिले. यानंतरही अनुराधा हिने पुन्हा पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. तसेच पैसे दिले नाही तर तुझ्या स्टुडिओत येऊन तुला मारले तर नावाची अनुराधा पाटील नाही अशी धमकी देत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत या करत आहेत.
Web Title: Refusal of photo shoot, woman threatened to file a rape case
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study