भंडारदरा: भंडारदरा धरणांतून सोडण्यात आलेले आवर्तन काल बुधवारी रात्री १० वाजता बंद करण्यात आले. मात्र निळवंडे धरणाचे आवर्तन सुरु असून आणखी दोन दिवस विसर्ग सुरु राहणार आहे.
दिनांक ३० एप्रिल रोजी निळवंडे धरणात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर दिनांक ३ मे रोजी निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. भंडारदरा धरणातून आवर्तन सोडले तेव्हा पाणीसाठा १६०० दलघफू होता. काल रात्री १० वाजाता आवर्तन बंद केले त्यावेळी धरणांत ११०० दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात ३०० दलघफू मृतसाठा आहे.
निळवंडे धरणाचा पाणीसाठा ८७३ दलघफू असून त्यात २६५ दलघफू मृतसाठा आहे. या धरणातून १६०० क़ुसेकने विसर्ग सुरु आहे. आणखी दोन दिवस हे आवर्तन सुरु राहणार आहे. आवर्तनात साधारणपणे ५०० दलघफू पाण्याचा वापर होणार आहे.
Website Title: Recurrence off from Bhandardara dam