Home अकोले राजूर: वाचनामुळे सामान्य ज्ञानात भर पडते- प्राचार्य मनोहर लेंडे

राजूर: वाचनामुळे सामान्य ज्ञानात भर पडते- प्राचार्य मनोहर लेंडे

राजूर: वाचनामुळे सामान्य ज्ञानात भर पडते- प्राचार्य मनोहर लेंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात पारीतोषीक वितरण समारंभ संपन्न.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी -वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आज खऱ्या अर्थाने वाचन संस्कृती ही काळाच्या ओघात लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाचन संस्कृती टिकली पाहीजे. वाचनामुळे सामान्य ज्ञानात भर पडते असे प्रतिपादन प्राचार्य मनोहर लेंडे यांनी केले.
वाचक मेळावा व समता सप्ताह स्पर्धा यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय राजूर(ता. अकोले) येथे पारितोषीक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी प्राचार्य मनोहर लेंडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या प्रसंगीकार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रानकवी तुकाराम धांडे, वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पवार, सचिव अनिल पवार, ए.बी. पवार, जे.डी.आरोटे, सुरेश आ. पवार, विकास पवार, सुरेश पवार, पंडीत गुरूजी यांसह परीसरातील वाचक, विद्यार्थी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
प्राचार्य लेंडे पुढे बोलताना म्हणाले कि, शेतात बियाणे पेरले नाही तर त्यात गवत उगवण होते त्याचप्रमाणे रिकामे मन राहीले तर अविचारांची उगवण होते. विज्ञान, तंत्रज्ञान, मिडीया या माध्यमांमुळे वाचक हा दुरावला जात आहे. त्यासाठी वाचन संस्कृती टिकली पाहीजे अशा शब्दात वाचकांना प्रबोधीत करून वाचनालयाचा असणारा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. याचा अभिमान वाटतो अशा शब्दात कौतुक केले.
त्याचप्रमाणे रानकवी तुकाराम धांडे यांनी आपल्या ग्रामीण शैलीत विविध कवितांचे सादरीकरण केले.
महात्मा फुले पुण्यस्मरण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यस्मरण या समता सप्ताह कालावधीमध्ये वाचनालयाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला, रांगोळी, निबंध, स्मरणशक्ती, सामान्यज्ञान, वाचन, वत्कृत्व, पाठांतर अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
या निमित्ताने वाचकांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र व पुस्तके भेट देण्यात आली. तसेच विदयार्थ्यांना शालेय साहित्य, प्रमाणपत्र व पुस्तके देऊन गौरवण्यात आले.
अनिल पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सुत्रसंचालन केले तर संदिप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माया सोनवणे यांसह वाचनालय कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Website Title: Reading leads to general knowledge Principal Manohar Lende


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here