Home महाराष्ट्र ठाकरे गटाचे रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाचे रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश

Breaking News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश.

Ravindra Waikar of Thackeray group joins Shinde group Shivsena 

मुंबई: महायुतीच्या निर्णयांचा रवींद्र वायकर यांच्यावर परिणाम झालाय. याचा मला आनंद वाटतोय. देशात विकासाचं पर्व आहे, जगभरात देशाचं आदरानं नाव घेतलं जातं. मतदारांना न्याय देणं अपेक्षित असतं, प्रश्न सोडवणं आवश्यक असतं म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ईडीच्या कचाट्यात सापडलेले ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, रवींद्र वायकर आज खऱ्या शिवसेनेत आलेले आहेत. मी काय ते काय गजाभाऊ काय.. आम्ही शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लोकांपर्यंत पोहोचवण्याचं गेल्या अनेक वर्षांपासून करतोय. रवींद्र वायकर यांचा संपूर्ण परिवार देखील आज इथे आहे. त्यांनी आपल्या मतदार संघातले प्रश्न मला बैठकीत सांगितलेले आहेत. त्यांचे काम केवळ मतदारसंघापुरते मर्यादीत नाही. तर त्यांना मुंबई पालिकेची खडा न् खडा माहिती आहे. आमच्यात तिसराच व्यक्ती संभ्रम निर्माण करत होता.

एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकं आमच्यात संभ्रम निर्माण करत होते. आज त्यांचाही संभ्रम दूर झाला आणि माझाही संभ्रम दूर झाला. आमच्यात तिसराच व्यक्ती संभ्रम निर्माण करत होता. जाऊ द्या आज राजकीय बोलत नाही. दीड वर्षात सरकारनं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतलेत. राज्यकर्त्यांनी लोकांसाठी चांगले दिवस कसे येतील ह्या गोष्टी लक्षात ठेवत निर्णय घ्यायचे असतात. आपलं पुरोगामी राज्य आहे प्रगत राज्य आहे आणि आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय.

पक्ष प्रवेशानंतर रवींद्र वायकर काय म्हणाले?

गेली ५० वर्षे मी शिवसेनेत काम केलं. जोगेश्वरीतील दंडली पासून पडेल ते काम केलं. चार वेळेस नगरसेवक झालो, तीनदा आमदार झालो. परंतु आता इथे पक्षप्रवेश करतोय त्याचं कारण वेगळं आहे. पहिले कोव्हिडमध्ये कामं झाली नव्हती. आरेत मला ४५ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी पैसे पाहिजेत. एनडी झोन देखील माझ्या मतदारसंघात आहेत. काही प्रश्न सत्तेत असल्याशिवाय सोडवले जात नाहीत. देशात मोदींची सत्ता आहे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे देखील चांगलं काम करतायेत, असं रवींद्र वायकर पक्ष प्रवेश करताना म्हणाले आहेत.

Web Title: Ravindra Waikar of Thackeray group joins Shinde group Shivsena 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here