Home महाराष्ट्र प्रसिद्ध अभिनेत्रीचे वडील, दिग्दर्शक यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्रीचे वडील, दिग्दर्शक यांचे निधन

Ravina Tondon Father Ravi Tandon Passes Away 

मुंबई | Ravi Tandon Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन यांचे वडील व दिग्दर्शक रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झाले. आग्रामध्ये जन्मलेले दिग्दर्शक यांनी सुरुवातीच्या काळात अनहोनी आणि खेल खेल में सारखे हिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.

अभिनेत्री रवीना टंडन त्यांची मुलगी आहे. संजीव कुमार यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक जवळचे मित्र  रवी टंडन यांनी चित्रपट दिग्दर्शक आरके नय्यर यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

शुक्रवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास रवी टंडन यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. रवीना टंडननेही तिच्या वडिलांचे फोटो शेअर करून भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

रवी टंडन यांनी दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘अनहोनी’ केला आहे. या चित्रपटातील संजीव कुमार यांच्या अभिनयाचे आजही कौतुक होत आहे. यानंतर त्यांनी ऋषी कपूरसोबत खेल खेल में , अक्षय कुमारचा खिलाडी चित्रपट बनवला गेला आहे.

Web Title: Ravina Tondon Father Ravi Tandon Passes Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here