Home संगमनेर Sangamner: संगमनेर शहरात मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन

Sangamner: संगमनेर शहरात मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन

Sangamner city rata roko Andolan

संगमनेर | Sangamner: बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारस संगमनेर बस स्थानकासमोर मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा समाज, बांधव सहभागी झाले होते. आंदोलनाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणसंदर्भात स्थगिती दिल्याने या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठवावी, चालू शैक्षणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, नोकरी भरतीत समाविष्ट करावे असे विविध निर्णय सरकारने घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे फलक, झेंडे घेत बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलानात आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अमोल निकम यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Rasta Roko Andolan of Maratha community in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here