Home पुणे Rape | प्रेमाचे नाटक करून तरुणीवर बलात्कार, अमली पदार्थाचे सेवन करून अमानुष...

Rape | प्रेमाचे नाटक करून तरुणीवर बलात्कार, अमली पदार्थाचे सेवन करून अमानुष कृत्य

Rape of a young woman by pretending to be in love

पुणे | Pune Crime: मैत्रीचे व प्रेमाचे नाटक करून तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे.तसेच अंमली पदार्थाचे सेवन करून अमानुष मारहाण केल्याचा धक्काददायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी या नराधमा आरोपीस अटक केली आहे.

निलेश दत्ताराम जंगम वय २४ रा. नऱ्हे असे अटक केलल्या तरुणाचे नाव आहे.हा प्रकार जानेवारी २०२१ पासून ते २४ मे २०२२ दरम्यान सुरु होता.

याप्रकरणी गारमळा धायरी येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी निलेश जंगम याने फिर्यादीसोबत मैत्रीचे व प्रेमाचे संबध ठेवले. तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबध प्रस्थापित केले. त्यानंतर नशा करून फिर्यादीला मारहाण केली. शारीरिक व मानसिक त्रास देत होता. २४ मे रोजी अशाच प्रकारे जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. नशा करून मारहाण केली. त्याच्या या छळास कंटाळून तिने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.  

Web Title: Rape of a young woman by pretending to be in love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here