Home क्राईम शाळेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शाळेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape of a minor girl taken to school

नागपूर | Rape Case: आपल्या मैत्रीसोबत खेळत असणाऱ्या एक ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने शाळेच्या शौचालयात नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी आरोपी तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अंकुश दिगंबर भास्कर वय २५ रा. कोंढासावळी असे या पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवारी दुपारी पिडीत अल्पवयीन मुलगी घरासमोर मैत्रिणीसोबत खेळत होती. आरोपी अंकुश हा त्याठिकाणी आला. त्याने पिडीत मुलीला बळजबरीने शाळेच्या परिसरात घेऊन गेला. याठिकाणी कोणी नसल्याची खात्री करत पिडीतेला शौचालयात घेऊन गेला. याठिकाणी मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केल्याने वेदना असहाय्य झाल्याने पिडीतेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. लहान मुलीचा आवाज ऐकून एका युवकाने शौचालयात धाव घेत पिडीत मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. आरोपीला पकडून ठेवले. आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अंकुश याला चांगलाच चोप दिला.

Web Title: Rape of a minor girl taken to school

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here