Home महाराष्ट्र Rape: ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape: ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape of a minor daughter of a worker who came to cut sugarcane

पुणे : ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका युवकाने पालात घुसून दोन वेळा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ऊरुळी कांचन येथील कॅनॉलच्या कडेला ऊसतोड कामगारांच्या पालामध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये हि घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित १७ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मालेगाव येथे राहणाऱ्या तरुणावर बलात्काराची (Rape) फिर्याद दाखल केली आहे.

पीडित मुलगी ही आपल्या आई-वडिलांबरोबर ऊसतोडणीसाठी उरळी कांचन परिसरात आली आहे. ऊरुळी कांचन येथील कॅनॉलच्या कडेला हि मुलगी तिच्या कुटुंबासमवेत पालात राहते. ऑक्टोबर महिन्यात ही मुलगी पाल मध्ये झोपली असताना या तरुणाने तिच्यावर दोन वेळा शारीरिक अत्याचार (sexual abused ) केले. सदर प्रकार मुलीच्या आई वडिलांना समजताच आई वडिलांनी फिर्याद दिली आहे. यावरून पोलिस उपनिरीक्षक चौगुले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Rape of a minor daughter of a worker who came to cut sugarcane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here