१३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, दोघा आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरी
Breaking News | Nashik Crime: १३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून अत्याचार केल्याप्रकरणी दोघा आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा.
नाशिक: सातपूर येथील शिवाजीनगरमध्ये अवघ्या १३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून अत्याचार केल्याप्रकरणी दोघा आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, ३५ वर्षीय आरोपीला ३५ हजार तर, २० वर्षीय आरोपीला १० हजार रुपयांचा दंडही केला आहे. सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० यादरम्यान सदरचा प्रकार घडला असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वसंत तुकाराम गांगोडे (३५, रा. शिवाजीनगर, सातपूर), हरिदास पांडुरंग राऊत ऊर्फ सोनू (२०, रा. देवडोंगरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार, तिच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या बाथरुममध्ये गेली असता, त्यावेळी संशयित वसंत गांगोडे याने बळजबरीने आतमध्ये घुसून तिच्यावर लैगिंग अत्याचार केले होते.
तर, पीडितेच्याच शाळेत शिकणारा आरोपी हरिदास राऊत याने तिच्याच घरी येऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केले होते. यातून पीडिता गर्भवती राहिली होती. तसेच, याप्रकरणी वाच्यता केल्यास चाकूने मारून टाकण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक प्रविण सूर्यवंशी यांनी केला आणि न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायधीश श्रीमती मलकापट्टी रेड्डी यांच्यासमोर खटल्याचे काम चालले. सरकार पक्षातर्फे अॅड. सुलभा सांगळे यांनी साक्षीदार, पंचांची साक्ष तपासली.
आरोपीविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने न्या. श्रीमती रेड्डी यांनी दोघा आरोपींना प्रत्येकी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच, आरोपी गांगोडे यास ३५ हजार आणि आरोपी राऊत यास १० हजारांचा दंड केला आहे. पैरवी अधिकारी म्हणून महिला अंमलदार रिना आहेर, विजय पाटील, सहायक उपनिरीक्षक इकबाल पिरजादे यांनी पाठपुरावा केला.
Web Title: Rape of 13-year-old girl, 20 years of hard labor for both accused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study