Home क्राईम तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करून गर्भपात- Rape Case

तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करून गर्भपात- Rape Case

Rape Case:  मैत्रीतून लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार, इच्छा नसताना गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस.

Rape Case Forced sexually abuse of young woman, abortion

जळगाव: मैत्रीतून लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार करून गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी  यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशियीत आरोपीस  अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरूणी ही परिवारासह राहत आहे. गावात राहणारा निलेश पंढरीनाथ पाटील याची तरूणीशी २०२१ मध्ये ओळख निर्माण झाली. यानंतर त्यांचे मैत्रीत रूपांतर झाले. नंतर तरूणीला निलेशने लग्नाचे आमिष दाखवत तिच्या आजीच्या घरी आणि त्यांच्या खळ्यात तरूणीवर जुन २०२२ पर्यंत वेळीवेळी वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून तरूणी गर्भवती राहिली.

सदरची माहिती निलेशला समजल्यानंतर त्याने तरूणीची इच्छा नसतांना गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान तरूणीने नातेवाईकांसह येथील पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित निलेश पाटील विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक झाली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

Web Title: Rape Case Forced sexually abuse of young woman, abortion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here