Home क्राईम Rape:  लिंबू डोक्यावर फिरवून जादूटोणा करीत तरुणीवर बलात्कार, हादरवणारी घटना

Rape:  लिंबू डोक्यावर फिरवून जादूटोणा करीत तरुणीवर बलात्कार, हादरवणारी घटना

Satara rape Case:  बलात्काराआधी या तरुणीच्या डोक्यावरुन लिंबू फिरवून जादूटोणा करण्याचा प्रयत्न.

Rape a young woman by turning a lemon on her head and performing witchcraft

सातारा: साताऱ्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्काराआधी या तरुणीच्या डोक्यावरुन लिंबू फिरवून जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाला. ही धक्कादायक आणि संताप आणणारी घटना उघडकीस आल्यानंतर सातारा  हादरला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने  तक्रारीत खळबळजनक आरोप केला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या आरोपांच्या आधारे आता पोलिसांनी  एकावर दाखल केला असून पुढील तपास केला जातो आहे. तसेच संशयित आरोपी असलेल्या नराधमास अटकही करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.  साताऱ्यात एका कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या बलात्कार प्रकरणी नोंद करण्यात आली असून अधिक तपास केला जातो आहे.

साताऱ्यातल्या एका कॉलनीत मुक्तार नासीर शेख या तरुणाने एका तरुणीला एकटीला रुममध्ये नेलं. त्यानंतर तिच्या डोक्यावरुन लिंबू फिरवला आणि भुरळ पाडून तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. पीडित तरुणीने आपल्या जबाबात या संपूर्ण प्रकाराचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सांगितला आहे. पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून घेतला आहे. सध्या सातारा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

साताऱ्यात उघडकीस आलेल्या या संतापजनक बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी 375 आणि 201 (3) प्रमाणे संशयित आरोपी असलेल्या मुक्तार नासीर शेख याच्यावर गुन्हा नोंदवून घेतलाय. पीडितेने केलेल्या आरोपांनंतर मुक्तान शेख याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं असून त्याची कसून चौकशी आता केली जाते आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण साताऱ्यात खळबळ माजली आहे.

Web Title: Rape a young woman by turning a lemon on her head and performing witchcraft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here