Rakha Jare Murder Case: आरोपी बाळ बोठे जामिनाबाबत मोठी बातमी
Rakha Jare Murder Case | अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर येत्या 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
जामीन अर्जावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. दरम्यान या जामीन अर्जावर येत्या 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी जातेगाव (ता. पारनेर) घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बोठे याचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज फेटाळला गेला होता. आता बोठेच्या वतीने वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी होणार आहे.यावेळी युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाच्यावतीने वकील ज्ञानेश्वर काळे बाजू मांडणार आहे तर बोठेच्या वतीने अॅड. मुकेश मोदी हे बाजू मांडणार आहेत.
Web Title: Rakha Jare Murder Case Big news about Baal Bothe bail