राजूर: वृक्षदिंडी कार्यक्रमानिमित प्रा.बाबा खरात यांनी सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना झाडे लावण्याची व संवर्धन करण्याची दिली शपथ.
राजूर: वृक्षदिंडी कार्यक्रमानिमित प्रा.बाबा खरात यांनी सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना झाडे लावण्याची व संवर्धन करण्याची दिली शपथ.
राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गु. रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालय येथे वृक्षदिंडी व वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला व या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बाबा खरात व तसेच वन अधिकारी जाधव साहेब, सामाजिक वनीकरण विभागाचे मानकर साहेब, मोरे साहेब आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व पाहुण्याचा विद्यालयाकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात प्रा. बाबा खरात यांच्या भाषणातून आवाहन करण्यात की, १ जुलै २०१६ साली सरकारने घोषणा केली कि “एकच लक्ष २ कोटी वृक्ष” आपण प्रत्यक्षात झाडे लावली २ कोटी ८६ लाख तसेच १ जुन २०१७ रोजी ४ कोटी वृक्ष संकल्प करून आपण ४ कोटी ५६ लाख वृक्ष लावण्यात आली. यावर्षी आपण १ जुलै २०१८ ते ३१ जुलै २०१८ या दरम्यान आपला संकल्प एकच १३ कोटी वृक्ष लागवड यासाठी सर्वांची मदत पाहिजे.
यावेळी कार्यक्रमात प्रा. बाबा खरात यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला झाडे लावण्याचे व त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात जवळपास दोन हजार विद्यार्थी आहेत त्यांनी प्रत्येकाला किमान एक झाड लावण्याचे आवाहन केले आहे. व तसेच सर्व विद्यार्थ्यांना झाडे लावण्याची व संवर्धन करण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला व यावेळी संस्थेचे सह सचिव मिलिंद उमराणी साहेब, माजी प्राचार्य येलमामे एस. टी, विद्यालयाचे प्राचार्य लेंडे. एम डी. व आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम कार्यक्रम अध्यक्ष तुपविहीरे एस.व्ही. व घाणे सर यांच्याकडून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. सावंत बी. वी. यांनी केले. या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना श्री कोटकर सर यांनी मांडली तर त्यास अनुमोदन श्री. गुंजाळ सर यांनी दिले. या कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचे आभार श्री. घिगे बी.एस. यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
Job vacancy in Axis Placement Services
Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).