सोने चोरी करणाऱ्या टोळीला राजूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राजूर | Rajur :- अकोले तालुक्यातील राजूर बस स्टँड परिसरात सोने चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील गुन्हेगारांच्या सराईत टोळीला राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व कर्मचारी यांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी राजुर शहरातील सौ कुसुम लक्ष्मण नाडेकर ( राहणार शाळेजवळ ) यांचे राजुर बस स्टॅन्ड येथे राजुर ते कोहणे या बसमध्ये बसताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सौ कुसुम नाडेकर यांची पर्समधून 96 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस 16 ग्रॅम 960 मिली असलेला चोरून घेऊन गेले. त्याबाबत कुसुम नाडेकर यांना कळताच त्यांनी लगेच राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार तसेच पोलीस कर्मचारी हे त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने तपास करत असताना पाटील यांना गुप्त बातमी द्वारे माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा बाबत श्रीरामपूर येथील सराईत टोळी चा हात असू शकतो. अशी गोपनीय माहिती मिळताच पथकातील पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पो.हे.कॉ.आघाव, पो.कॉ.फटांगरे,पो.कॉ.गाढे,पो. कॉ.वाडेकर व अकोले पोलिस स्टेशन चे पो.कॉ.मैड या सर्वांनी मिळून अकोले बस स्टँड वर जाऊन मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून हजारो रुपयांचा नेकलेस हार हस्तगत केला आहे. साहिल नाशिक खान राहणार श्रीरामपूर, अर्जुन कानिफनाथ भोसले राहणार अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर, कमलेश उत्तम पवार राहणार अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर, गुफरान निसार पठाण राहणार सोमेश्वर पथ श्रीरामपूर या चार जणांना राजूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता यापूर्वीही त्यांनी राजूर परिसरात असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना मुद्देमालासह राजूर पोलिसांनी ताब्यात असून अधिक तपास सुरु आहे. या कामगिरीनंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी राजूर पोलिसांचे कौतुक केले आहे.
Web Title: Rajur police handcuffs gang of gold thieves