Home अकोले राजूर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलकडून महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग

राजूर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलकडून महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग

Rajur female police officer was molested by a police constable Crime filed

राजूर | Crime: अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशन मधील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्याने शनिवारी दि. ५ जून रोजी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब दगडू आघाव असे या पोलीस कॉन्स्टेबल आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ३० मे २०२१ रोजी आरोपी याने फिर्यादीशी मैत्री करण्याचे बोलून तिचा हात धरला व तिच्या इच्छेविरुद्ध मिठी मारून तिचा विनयभंग केला. यास फिर्यादी पोलीस कर्मचारी महिलेने विरोध केला असता आरोपी तिला म्हणाला की, या प्रकाराबाबत कोणाला काही एक सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब दगडू आघाव राजूर याच्याविरोधात भा.द.वि. कलम ३५४ (अ) व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व संगमनेर पोलीस ठाण्यातील तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी राजूर पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती घेतली. यामधील आरोपी फरार असल्याचे समजते.

Web Title: Rajur female police officer was molested by a police constable Crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here