Home अकोले अकोले: कर्ज नाकारल्याने राजूरच्या तरुणाचे बँकेविरुद्ध उपोषण

अकोले: कर्ज नाकारल्याने राजूरच्या तरुणाचे बँकेविरुद्ध उपोषण

अकोले: कर्ज नाकारल्याने राजूरच्या तरुणाचे बँकेविरुद्ध उपोषण

राजूर: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत करण्यात आलेला प्रस्ताव नाकारण्यात आला. त्यामुळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करीत रोहित दयानंद सोनावणे या तरुणाने राजूर येथील बसस्थानक परिसरात सोमवारपासून उपोषण सुरु केले आहे.

निवेदनात म्हंटले आहे कि, आपण पिण्याच्या पाण्याचा प्लांट सुरु करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी येथील महाराष्ट्र बँकेत केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर बँकेच्या व्य्वास्थापनेने २८ सप्टेंबर रोजी त्यातील त्रुटीबाबत कळविले. यानुसार ३० ऑक्टोबरला सोनावणे यांनी लेखी म्हणे सदर केले. यात बी आय एस सर्तीफिकॅट, पाणी तपासणी रिपोर्ट व बिगर शेती प्लांट संदर्भात त्रुटी कळविल्या होत्या. यानंतर अनेक वेळा भेटी दिल्या असता व्यवस्थापनानी आपली दिशाभूल करत नेहमीच उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप सोनावणे यांनी केला.

महाराष्ट्र बँकेच्या शाखाधीकार्याच्या मनमानीला कंटाळून व झालेल्या मानसिक त्रासामुळेच उपोषणाचा मार्ग निवडल्याचे सोनाविणे यांनी सांगितले.

उपोषणास जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे जि. सदस्या सुनिता भांगरे यांच्यासह अनेकांनी सह्या करत पाठींबा दिला.  

Website Title: Rajur Fasting against bank of maharshtara

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here