Home अकोले भंडारदरा येथे एका १५ वर्षीय मुलाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू

भंडारदरा येथे एका १५ वर्षीय मुलाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू

Rajur boy fell to his death at Bhandardara

राजूर | Rajur : अकोले तालुक्यातील गर्दनी येथील ओम संजय पाबळे वय १५ या मुलाचा भंडारदरा धरणाच्या गेट खालील एका खड्ड्यातील शेवाळावरून पाय घसरून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली.

ओम वा त्याची आई, वडील, भाऊ आणि त्याच्या मामाची मुलगी असे भंडारदरा येथे फिरण्यासाठी गेले होते. या सर्वांनी भंडारदरा जलाशयात बोटिंग केली. फिरले,  ओमच्या वडिलांच्या मित्राकडे गेले. तेथे जेवण केले. जेवण झाल्यावर ही मुले धरणाच्या स्पीलवे गेट खालील खडकावर फिरण्यासाठी गेले. तेथे असलेल्या खड्ड्याच्या कडेला शेवाळावरून ओमचा पाय घसरला आणि तो पाणी असलेल्या खड्ड्यात पडला. यावेळी त्याच्या नाका तोंडात पाणी गेले. मुलांनी आरडाओरडा केला तेथे असणारा गुरे चारणारा गुर्हाखी आला मात्र रस्ता अडगळीचा असल्यामुळे बराच वेळ निघून गेला. त्यांच्या आईला ही बाब समजताच तिने व तिच्या सोबत असलेल्या महिलेने ध्वपाल करीत राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र अगोदरच ओमचा मृत्यू झाला होता, राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Rajur boy fell to his death at Bhandardara

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here