राजूर पोलिसांची कारवाई: किराणा दुकान फोडणारे आरोपी गजाआड
Rajur Theft News: पिंपरकणे येथील किराणा दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपींना राजूर पोलिसांनी ताब्यात (Accused) घेतले.
राजूर: अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथील किराणा दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपींना राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपरकणे येथील पांडुरंग श्रावणा पिचड यांचे किराणा दुकान चोरट्यांनी फोडून मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत पिचड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 185/2022 भारतीय दंड संहिता 380, 457 प्रमाणे दाखल झाला. राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त माहितीद्वारे पिंपरकणे गावातील रविंद्र भरत गवारी, धर्मानाथ मारुती पिचड, विठ्ठल दुंदा सावळे, अनिल कारभारी पिचड, योगेश रामदास पिचड यांनी चोरी केल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.
या संशयीत व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पांडुरंग पिचड रा. पिंपरकणे, ता. अकोले यांचे दुकान फोडल्याचे कबुली दिली आहे. आरोपींच्या ताब्यातून 11 हजार 230 रूपये किंमतीच्या दुकाणातील वस्तु, कटलरी माल, गॅस टाकी व गॅस शेगडी, किराणा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल के. डी. नेहे, पोलीस कॉन्स्टेबल विजय फटांगरे, संभाजी सांगळे, अशोक काळे, अशोक गाढे, राकेश मुळाणे यांनी केली.
Web Title: Rajur Accused of breaking grocery store