संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना करोनाची लागण
Rajnath Singh Corona Positive: देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना करोना कोरोनाची लागण झाली आहे. राजनाथ सिंह यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः आज ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. राजनाथ यांना करोनाची सौम्य लक्षणे असून ते घरीच उपचार घेत आहेत व त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.
राजनाथ सिंह यांना करोनाची लागण झाली असून असून याबाबत त्यांनी ट्वीटरवरून ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत आणि मी होम क्वारंटाइन आहे’, असे राजनाथ यांनी नमूद केले आहे. ‘अलीकडे काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले आहेत त्या सर्वांनी कोविड चाचणी करून घ्यावी आणि विलगीकरणात राहावे’, असे आवाहनही राजनाथ यांनी केले आहे.
Web Title: Rajnath Singh Corona Positive