Rain Alert: अहमदनगर जिल्ह्याला यलो अलर्ट
Ahmednagar rain Alert: नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात पुढील ४८ तासांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता, नगर जिल्ह्याला यलो अलर्ट.
अहमदनगर: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन ‘मंदौस’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या वादळामुळे नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडू शकतो आणि शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान विभागाने उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा दिला होता.
आता महाराष्ट्रालासुद्धा याची भीती असल्याचे मत व्यक्त होत आहे. हे वादळ 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुमारास 85 किमी प्रतितास वेगाने वार्यासह पुद्दुचेरी आणि श्रीहरिकोटा बेट ओलांडण्याची शक्यता सांगितली होती. या वादळाचा प्रभाव 10 डिसेंबरपर्यंत राहील असे ही म्हटले जात होतं. मात्र याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 ते 48 तासात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Web Title: Rain Yellow alert for Ahmednagar
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App