राज्यात सुरु होणार पुन्हा एकदा पाउस, पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार
Rain Alert: १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार, १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार.
नागपूर: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार, तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
१५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असून मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात पाऊस पडला नाही. मात्र, शेवटच्या आठवड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाचा जोर कमी झाला.
हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ऑगस्टपर्यंत राज्यात तूरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, चार ऑगस्टपासून तर नऊ ऑगस्टपर्यंत बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत आहे.
Web Title: Rain will start again in Maharashtra
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App