Home अकोले भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात पुन्हा पावसास सुरूवात

भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात पुन्हा पावसास सुरूवात

Bhandardara  Update:  दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात पुन्हा पावसास (rain) सुरूवात.

Rain has started again in the catchment area of ​​Bhandardara and Mula dam

भंडारदरा:  जून महिन्याच्या अखेरीस भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झाली  त्यानंतर पावसाचा जोर मंदावून दोन तीन दिवस विश्रांती घेतली होती मात्र आता दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात काल बुधवारी पुन्हा पावसास सुरूवात झाली. आज गुरूवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पाणलोटात शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

गत आठ दिवसांपूर्वी भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस पडल्याने धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाली. पण दोन दिवसांपासून पाऊस झाला नाही. त्यामुळे नवीन पाण्याची आवक मंदावली. पावसामुळे आंबित बंधारा आणि पिंपळगाव खांड धरण भरले. पण पुढे या भागातही पाऊस थांबला आणि मुळा नदीतील विसर्ग काल सायंकाळी 705 क्युसेकवर आला. काल दिवसभर ढगाळ हवामान होते. पण सायंकाळनंतर रिमझीम पावसास सुरूवात झाली. अधून मधून रिपरिप होत होती. आज पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुन्हा पावसास सुरूवात झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: Rain has started again in the catchment area of ​​Bhandardara and Mula dam

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here