Home महाराष्ट्र Rain: राज्यात यंदा चारही महिने बरसणार पाऊस; ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज

Rain: राज्यात यंदा चारही महिने बरसणार पाऊस; ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज

Rain for four months in the Maharashtra forecast of Australian meteorological department

Rain Alert | औरंगाबाद: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.. यंदाचा पावसाळा मागील दोन वर्षासारखाच पाणीदार असणार आहे. कारण पावसाळ्यातले चारही महिने चांगला पाउस (Rain) बरसणार आहे असा अंदाज आस्ट्रेलियन हवामान खात्यानं (Australian meteorological department) वर्तविला आहे.

यंदाच्या पावसाळ्यातले चारही महिने पाऊस धोधो पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं हा अंदाज वर्तविला आहे. जूनच्या सुरुवातीपासूनचं यंदा पाऊस सुरु असणार आहे. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही सामान्यांपेक्षा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यापुढच्या काळात मागच्या वर्षासारखी अतिवृष्टीची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. आता ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या अंदाजापाठोपाठ भारतीय हवामान खात्याकडून अंदाज येणार आहे. आता सध्याच्या अंदाजानुसार ९८ ते १०४ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Rain for four months in the Maharashtra forecast of Australian meteorological department

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here