पावसाचा इशारा: राज्यात आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट
Rain Alert: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने राज्यातील ९० टक्के भागाला यलो अलर्ट.
पुणे: राज्यात समाधानकारक पाऊस (Rain) झाला असला तरी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने राज्यातील ९० टक्के भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर गडचिरोली व गोंदियाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच मंगळवारी (दि. 19) काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडेल; मात्र 20 नंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात, प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशात पाऊस वाढला आहे. महाराष्ट्रात त्यामुळे 18 व 19 रोजी मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यातील 90 टक्के भागात सोमवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट:
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, बीड, परभणी, अकोला, अमरावती, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर.
Web Title: Rain alert Yellow alert for these districts in the state today