Home अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘मुसळधार’चा इशारा, अवकळा काढणार

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस ‘मुसळधार’चा इशारा, अवकळा काढणार

Breaking News | Ahilyanagar Rain Alert: विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली.

Rain Alert warning for two days in Ahilyanagar 

अहिल्यानगर : जिल्ह्यात २६ ते २८ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी येलो अलर्टही जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भीमा नदीस दौंड पुल येथे १९ हजार ५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा.

Breaking News: Rain Alert warning for two days in Ahilyanagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here