संगमनेर शहरात बेकायदेशीर गुटकाविक्री करणाऱ्या दुकानांवर छापे
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील बेकायदेशीर गुटकाविक्री करणाऱ्या तीन दुकानांवर छापे टाकून तिघांविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे एक लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून एक जण पसार झाला आहे. शहरातील बाजारपेठेतील तांबोळी ट्रेडर्स व नायकवाडपुरा व घुलेवाडी परिसरातील मारुती लोन्स जवळ अशा तीन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.
बाजारपेठेतील तांबोळी ट्रेडर्स या दुकानातून ९ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास दुकान चालक राजू पापाभाई तांबोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नायकवाडपुरा येथील रुबी बिल्डिंगमध्ये छापा टाकण्यात आला यामध्ये ३ हजार ६०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी रफिक शेख याच्यावर कारवाई करण्यात आली. हा आरोपी फरार झाला आहे.
मारुती लोन्स परिसरातील अभिजित पगडाल रा. पदमानगर याच्याकडून ८७ हजार ८५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या तीनही प्रकाराचा अधिक तपास सहायक फौजदार गायकवाड हे करीत आहेत.
Web Title: Raids on shops selling illegal gutka in Sangamner