अहमदनगर: अश्लिल चाळे सुरु असलेल्या कॅफेवर छापा
Breaking News | Ahmednagar Raid: शाळा कॉलेजच्या मुला मुलींना अश्लिल – चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मनमाड रस्त्यावरील एका कॅफेवर तोफखाना पोलिसांनी छापा.
अहमदनगर: कॅफेच्या नावाखाली शाळा कॉलेजच्या मुला मुलींना अश्लिल – चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मनमाड रस्त्यावरील एका कॅफेवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला.
रविवारी (११ ऑगस्ट) दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार सतीश त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून कॅफेचा मालक सागर
अशोक उदमले (वय २८ रा. हिवरेझरे ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड रस्त्यावरील शाही इन हॉटेलच्या जवळ एका गाळ्यात प्लायवुडचे कम्पार्टमेंट करून, पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजच्या मुला- मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.
Web Title: Raid the cafe where obscene chale is going on
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study