हॉटेलवर सुरूअसलेल्या वेश्याव्यवसायावर छापा ! 12 ग्राहकांना रंगेहाथ
Breaking News |Ahmednagar: दोन हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर श्रीगोंदा पोलिसांनी छापा (Raid) टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या बारा महिला व ग्राहकांना रंगेहात पकडले.
श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी शिवारातील दोन हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या बारा महिला व ग्राहकांना रंगेहात पकडले.
या कारवाईत २८ हजार रुपयांची रोख रक्कमेसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी हॉटेल मालक चालक व ग्राहकावर स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ ढोबळे तसेच पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर या प्रकरणी किरण रावसाहेब जरे (रा. अहमदनगर), सचिन कानिफ वाबळे, कल्याण राजेंद्र पठारे (सर्व रा.बनपिंपरी) यांच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील बनपिंपरी शिवारातील प्रशांत हॉटेल व सुप्रीम हॉटेलवर राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मिळाली.
त्या अनुषंगाने त्यांनी श्रीरामपूर येथील एका पोलिस पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पथकाने कारवाई करत तेथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या सहा महिला व तीन ग्राहक यांच्यासह हॉटेल मालक महिलेसह सचिन कानिफ वाबळे, कल्याण राजेंद्र पठारे या दोन मॅनेजरला ताब्यात घेतले.
तसेच तेथून जवळच असलेल्या सुप्रीम हॉटेलवर देखील कारवाई करत वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिला व ग्राहकांना रंगेहाथ पकडत हॉटेल मालक किरण रावसाहेब जरे यास ताब्यात घेतले. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येऊन श्रीरामपूर पोलिसांनी वेश्या व्यवसायावर कारवाई केल्याची चर्चा रंगली आहे.
बनपिंपरी परिसरात अनेक दिवसापासून राजरोसपणे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे बोलणे जात होते, परंतु याकडे श्रीगोंदा पोलिसांनी दुर्लक्ष केले असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
Web Title: Raid on the ongoing prostitution at the hotel! 12 customers hand in hand
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study