Home क्राईम संगमनेर शहरात मटका जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांवर गुन्हा

संगमनेर शहरात मटका जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांवर गुन्हा

Raid on Matka gambling den in Sangamner city

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर शहरात जुगार आणि मटका अड्ड्यावर श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या पथकाने छापा (raid) टाकून १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने शहरातील झुंझूर वाडा, देवी गल्ली येथे छापा टाकून जुगार आणि मटका खेळणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एकाच दिवशी विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि संगमनेर शहर पोलीस यांनी अवैध धंद्यांवर कारवाई केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील झुंझूर वाडा, देवी गल्ली येथे छापा टाकून कारवाई करण्यात आली. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या पथकातील प्रमोद शांतवन जाधव यांनी फिर्याद दिली आहे.  यावेळी दिलीप रघुनाथ ढगे, रवींद्र श्रीधर रुपवते, अफझलखान अन्सार पठाण, सुनील दामू गायकवाड, राहुल मच्छिंद मुसळे, घनश्याम रमेश जेधे, युसुफ मिठूभाई सय्यद, सुरेश गंगाधर झोळेकर, वाहिद अजीज पठाण, सय्यद मुस्ताक फकीर मोहम्मद, सोमनाथ सुखदेव गोर्डे, हौशीराम नारायण बांगर अशा १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत १९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Raid on Matka gambling den in Sangamner city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here