मसाज पार्लरवर धाड, नको त्या अवस्थेत सापडल्या मुली
Breaking News | Amravati Crime: एका स्पा-मसाज सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काल धाड टाकत स्पा भागीदारासह चार तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतले.
अमरावती: अमरावतीच्या राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा-मसाज सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काल धाड टाकत स्पा भागीदारासह चार तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतले. या स्पा सेंटरवर मसाजच्या नावावर देहविक्रीचा व्यवसाय आणि तरुणीईचे अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली.
एक वर्षापासून हा स्पा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक संशयास्पद साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काही अंडरगारमेंट्स बाथरुममध्ये आढळून आले. अमरावती शहराच्या मध्यवस्तीत अशाप्रकारे सुरू असलेल्या अवैध धंद्यांबद्दल काही लोकप्रतिनिधींनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराची चौकशी सिटी कोतवाली पोलीस करत आहे.
Web Title: Raid on massage parlour, girls found in unwanted condition
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study