Raid: कारमधून सुरू होती गुटखा वाहतूक, तिघांना अटक
Ahmednagar raid: गुटखा वाहतुकीचापर्दाफाश, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
अहमदनगर | कोपरगाव: जिल्हाभर गुटखा विक्री अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी सुरूच आहे. कोपरगाव तालुक्यातील टाकळी नाका येथून सुरू असलेल्या गुटखा वाहतुकीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल तीन लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त केला असून, तिघा जणांना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या कारवाईने गुटख्या विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी अकोले, संगमनेर आणि पारनेर तालुक्यात कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. कोपरगाव येवला रोडवरील टाकळी नाका येथे कारमधून गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू घेऊन येणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.
पोलिस निरीक्षक कटके यांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक कोपरगावला रवाना केले. या पथकाने कोपरगाव पोलिसांच्या मदतीने टाकळी नाका येथे सापळा लावला असून, दोन वाहने संशयितरीत्या येत असल्याची पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी वाहने थांबवून झडती घेतली असता, महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, सुपारी आढळून आली. पोलिसांनी वाहनात असलेल्या व्यक्तींनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांची नावे, गाव नावे सांगितली. विचारले असता त्यांनी वसिम चाँदभाई शेख (३४, रा. गांधीनगर, कोपरगाव), राजमल मिश्रीलाल बोथरा (५०, रा. निवारा हाऊसिंग सोसायटी, कोपरगाव), अर्जुन लक्ष्मण शेळके (४५, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) अशी तिघा आरोपींना अटक करून कोपरगाव पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून, त्यांच्याकडून गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी असा एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार मनोहर शेजवळ, पोलिस कॉन्स्टेबल संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संतोष लोंढे आदींच्या पथकाने केली.
अवैध व्यवसायांवर कारवाईचे आदेश
शहरासह ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री, गोमांस, गुटखा विक्री, जुगार, मटका, बिंगो अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी बोलताना दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील अकोले, संगमनेर आणि पारनेर तालुक्यात गुटख्यावर कारवाई करण्यात आली असून, लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे ते म्हणाले.
Web Title: Raid on Gutkha was being transported in a car, three arrested
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App