Home अहमदनगर थेट गोठ्यात अन्न औषध प्रशासनाची कारवाई, दूध भेसळ दोघांवर गुन्हा

थेट गोठ्यात अन्न औषध प्रशासनाची कारवाई, दूध भेसळ दोघांवर गुन्हा

Ahmednagar Crime News: अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात (Raid) भेसळयुक्त दूध व त्यासाठीचे घातक रसायन आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ.

Action of Food and Drug Administration, crime against two adulterers of milk

राहुरी: तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त दूध व त्यासाठीचे घातक रसायन आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या खबरीवरून अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने दि. १० मार्च रोजी सकाळीच तांदूळवाडी शिवारात मांजरी रोडवर टाकलेल्या छाप्यात संशयास्पद वस्तू रसायन तसेच भेसळयुक्त दूध आढळून निरीक्षक आले होते. याबाबत दिवसभर नमुने घेत पंचनामा करण्यात आला.

याबाबत औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप सूर्यभान म्हसे याच्या, तर अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांच्या फिर्यादीवरून नवनाथ खाटेकर आहे. याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध प्रशासनाने थेट गोठ्यात जाऊन केलेल्या कारवाईने दूध उत्पादकात एकच खळबळ उडाली आहे.

औषध प्रशासनाने दोन स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. पहिली फिर्याद अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी संदीप सूर्यभान म्हसे याच्याविरुद्ध दिली आहे. यात व्हे पावडर (स्टिंग्ड डिगिनरलाईज्ड डी.एम. ४०) २३ किलो डेअरी पडगियर कुटे पावडर २३ किलो लाइट लिक्विड पॅराफिन एच जी ११८ लिटर कृत्रिम दूध ३८ लिटर व गाय दूध ३८ लिटर आढळून आल्याचे म्हटले आहे.

दुसरी फिर्याद अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी नवनाथ खाटेकर याच्या विरुद्ध दिली आहे. त्यात व्हे पावडर (स्टिंग्ड स्प्रेड्राईड आर के छाप (अंदाजे किंमत ४२,००० हजार) आढळल्याचे म्हटले आहे. औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर संदीप मिटके, पोलिस मेघशामडांगे उपनिरीक्षक खोंडे, आदींनी भेट देऊन माहिती घेतली.

Web Title: Raid Action of Food and Drug Administration, crime against two adulterers of milk

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here