शेतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून बेदम मारहाण
राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे धक्कादायक घटना घडली आहे. शेत नांगरणीच्या कारणातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गजाने बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी मुसा मेहबूब पठाण वय ३६ रा. ब्राम्हणी ता. राहुरी याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राम्हणी येथील शेत नांगरणीच्या कारणावरून मुसा पठाण याच्यावर पाच जणांनी मिळून हल्ला करत कोयत्याने वार केले. गज व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत मुसा पठाण गंभीर जखमी झाला आहे. पठाण यांच्या फिर्यादीवरून शब्बीर मिरसाहब शेख, नवाब मीरसाहेब शेख, सद्दाम शब्बीर शेख, अल्ताब नवाब शेख, सुन्ना अहमद शेख सर्व रा. ब्राम्हणी या सहा जणांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास हवालदार पारधी हे करत आहे.
Web Title: Rahuri young man was stabbed to death in a farm dispute