Home अहमदनगर महिलेला गाडीत घालून अज्ञातस्थळी नेऊन विनयभंग

महिलेला गाडीत घालून अज्ञातस्थळी नेऊन विनयभंग

Rahuri woman was taken to an unknown place in a car 

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेला ताहाराबाद रोडने पांढरया रंगाच्या गाडीत घालून अज्ञातस्थळी नेऊन तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात या महिलेने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज राजू आहेर रा, राहुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुरी कारखाना ता. राहुरी ताहाराबाद रोडला दिनांक १७ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी सगळगीळे वस्ती यांच्या वखारीत लाकडे घेण्यासाठी जात असताना मनोज राजू आहेर याने फिर्यादी महिलेस सफेद रंगाच्या चार चाकी गाडीत बसविले. गाडीतून एक किलोमीटर ताहाराबाद रोडला घेऊन जाऊन त्या ठिकाणावर फॉरेस्टच्या आत नेऊन मनोज आहेर याने फिर्यादीच्या अंगावर हात टाकून लगट करत विनयभंग केला.

यावेळी फिर्यादीने प्रतिकार केला असता गाडी सीट खालून छोटी बंदूक काढून तू कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या ठेकेदाराला गोळ्या झाडून ठार मारीन अशी धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल आव्हाड हे करीत आहेत.

Web Title: Rahuri woman was taken to an unknown place in a car 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here